मुंबई

गणेशभक्तांसाठी खूशखबर 

प्रमाेद जाधव

अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्‍यातील मूर्ती व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे लाखो मजुरांची उपासमार होऊ लागली होती. आता राज्य सरकारने या व्यवसायाला दिलासा देताना मजूर, कारागिरांनी मास्क, सॅनिटायझरच्या वापरासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अटी-शर्तींवर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे शेकडो कारखाने पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. 

कोरोनावर मात करण्यासाठी 23 मार्चपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सेवा बंद करण्यात आल्या. गणेशोत्सवासाठी अवघा साडेतीन महिन्यांचा कालावधी राहिला असताना कारखाने आणि वाहतूक बंद पडल्याने मूर्ती साकारण्यासाठी लागणारी माती व साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे हजारो मजूर, कारागीर हताश झाले होते. त्यांनी ही व्यथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासमोर मांडली. त्यांनी ती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सरकारने अटी-शर्तीवर कारखाने सुरू करण्याची परवानागी दिली आहे. त्यामुळे पेण येथील मूर्ती कारखानदारांसह मजुरांना दिलासा मिळाला आहे. 

पेण तालुक्‍यात मूर्ती तयार करण्याचे सुमारे दोन हजार कारखाने आहेत. पेणच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. सरकारने मूर्ती तयार करण्यासाठी परवानगी देऊन या व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. मूर्तीसाठी असलेली बाजारपेठही खुली केली तर या व्यवसायाला अधिक बळ मिळेल. 
- अजित लांगी, मूर्तिकार 

मार्चपर्यंत परदेशात जाणाऱ्या गणेशमूर्ती लॉकडाऊनमुळे पोहचू शकल्या नाहीत. याद्वारे वर्षाला सुमारे पाच कोटींची उलाढाल होते. मात्र आता त्यामध्ये घट झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीनुसार मूर्ती तयार करण्यास परवानगी मिळाली आहे. 
- श्रीकांत देवधर, अध्यक्ष, श्री गणेशमूर्ती व्यवसाय संघटना. 

रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्ती तयार करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मूर्ती तयार करण्याचे कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हा व्यवसाय सुरू करताना अटी-शर्ती लागू केल्या आहेत. 
- अरुणा जाधव, तहसीलदार, पेण. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT